रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये 6 ऑगस्ट रोजी मोफत तपासणी शिबीर

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये 6 ऑगस्ट रोजी मोफत तपासणी शिबीर

कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या पुन्हा एकदा वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. 

सन २०१४ मध्ये कोकणातील पहिले अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर सुरु झाले. यामुळे वंध्यत्व घेऊन जगणाऱ्या अनेक महिलांना मोठे वरदान प्राप्त झाले. गेल्या ८ वर्षात रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अनेक महिलांनी मातृत्वाचा आनंद घेऊन आपले कुटुंब पूर्ण केले आहे. अनेक जोडप्याना डॉ. तोरल शिंदे यांचे मार्गदर्शन कधी विना खर्च, कधी कमी खर्चात सुद्धा अपत्य प्राप्तीचा आनंद घेता आला आहे. रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर सुरु झाल्यापासून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर येथील धन्वंतरी रुग्णालयातील या रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या माधयमातून डॉ. तोरल शिंदे या मोफत तपासणी शिबीर घेत असत. त्याचा लाभ सुद्धा अनेक महिलांना झाला आहे. मात्र कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांच्या कालखंडात ही शिबिरे बंद झाली होती. 

मात्र डिसेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा ही मोफत शिबिरे सुरु होणार असून डॉ. तोरल शिंदे या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. शिबीर आता ४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत धन्वन्तरी रुग्णालयात होणार असून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन धन्वंतरी रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरीत 02352-221282, 02352- 355059, 9527044901 या क्रमांकावर संपर्क साधावा.