विरश्री ट्रस्ट तर्फे 11 डिसेंबररोजी सायकल रॅली

विरश्री ट्रस्ट तर्फे 11 डिसेंबररोजी सायकल रॅली

सुदृढ रत्नागिरी साठी सातत्याने काम करणाऱ्या विरश्री ट्रस्टतर्फे यंदा कुटुंबासह सायकलिंग हा उद्देश समोर ठेऊन सशक्त रत्नागिरी प्रदूषणमुक्त रत्नागिरी हे ब्रीद घेऊन सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.

याबाबतची माहिती विरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. निलेश शिंदे यांनी दिली. 11 डिसेम्बर 2022 रोजी ही सायकल रॅली शहरातील शिवाजी नगर मंगळवार बाजार येथून सुरु होईल आणि त्यानंतर जयस्तंभ – झरी विनायक ते वायंगणी फाटा आणि त्याचं मार्गाने परत अशी ही सायकल रॅली काढण्यात येईल. सकाळी 5.30 वाजता या रॅलीला सुरुवात होणार असून कुटुंबातील केवळ एका सदस्यानेच नव्हे तर कुटुंबानेच या रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.

विरश्री ट्रस्ट ने याहिपूर्वी अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे तर सन 2018 आणि 2019 या दोन सलग वर्षी सायकल रॅली चे सुद्धा यशस्वी आयोजन विरश्री ट्रस्टने केले आहे. कोरोना काळानंतर आता पुन्हा एकदा 11 डिसेम्बर रोजी विरश्री तर्फे सायकल रॅली काढण्यात येतं असून यात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. निलेश शिंदे यांनी केले आहे.

रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.